मुंबई : रविवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. स्टेशन अधीक्षक रामकेश मीना यांनी तात्काळ 108 क्रमांकावर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांना घटनेची माहिती दिली आणि रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तिची सुखरूप सुटका केली.
नालासोपारातल्या पश्चिमेकडील हनुमान नगरात राहणारी रेश्मा बेगम (वय 26) ही गोरेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. रेल्वे स्थानकाच्या मधल्या ब्रिजवर असताना तिला अचानक कळा सुरू झाल्या. दरम्यान, 9.15 वाजता तिने ब्रिजवरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. तात्काळ घटनास्ळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तीची सुटका केली. रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाळ-बाळंतिणीला वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आलंय. दोघांची प्रकृती स्थीर असल्याचे सुत्रांनी सांगितले.



Post A Comment:
0 comments so far,add yours