धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं कधी नव्हे एवढं बहुमत दिलं. ऐतिहासिक बहुमतानं जिंकून दिलं आणि त्यांनी निवडून आल्यावर काय दिवे लावले तर नोटबंदी केली अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी धुळ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा झाला, त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ज्या व्यापाऱ्यांनी मोदींना साथ दिली त्याच व्यापाऱ्यांची त्यांनी नोटबंदी करून वाट लावली. पाच वर्ष त्यांनी फक्त थापाच मारल्या, एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही अशी टीकाही त्यांनी केली.

देशात निवडणूकांशिवाय दुसरा उद्योग उरला नाही. सारख्या निवडणुका सुरूच असतात. त्याच्यासाठी पैसा पाहिजे, मग पैशासाठी निवडणूका असच दुष्टचक्र राहिलं तर देशाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या पक्षातील माणसे घेऊन निवडणूक लढवायची हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. भाजपकडे निवडणूक लढवायाल उमेदवार नसल्याचंही ते म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours