पुणे: पाॅर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका भारतीय नौदलाच्या एका कमांडरने आपल्या पत्नीच्या फोटोशी छेडछाड करून ते गुगल अॅपवर अपलोड केल्याचा आरोप त्याच्याच पत्नीने केला आहे. या कमांडरची पत्नीही सैन्यात माजी सैनिक होती. हा कमांडर दिल्लीत रुजू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या कमांडवर आरोप आहे की, त्याने आपल्या जी-मेल आपल्या पत्नीसह सहकाऱ्यांच्या पत्नीचे फोटो आणि इतर महिलांचे फोटो हे मॉर्फ करून अपलोड केले. मंगळवारी या कमांडरच्या पत्नीने पोलिसांना जबाब दिला. ती आपल्या दोन मुलांसह पुण्यात आपल्या आईच्या घरी राहते. कारण गेल्या ११ वर्षांपासून पती हा पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी केला. त्यामुळे ती प्रचंड वैतागली होती. कमांडरच्या घरच्यांनी त्याची सवय मोडण्यासाठी समुपदेशकाला बोलावलं होतं. पण त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा छळ सुरू केला.
या महिलेनं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं की, 'लग्नानंतर आमचं आयुष्य चांगल्या प्रकारे सुरू होतं. पण काही दिवसांनंतर माझा पती हा रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर पॉर्न व्हिडिओ पाहत होता. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं असता त्याने माफी मागितली. पण काही दिवसांनंतर पुन्हा पॉर्न व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली.'
कमांडरची पत्नी पुढे म्हणाली की, माझा पतीचे त्याच्या सहकाऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात पुणे कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. भादवी कलम ५०९ आणि ६७ नुसार कमांडरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हे शाख्याचे पोलीस महादेव कुंभार यांनी सांगितलं की, 'आम्ही नौदलाच्या अधिकाऱ्यांना कमांडरच्या पत्नी दाखल केलेल्या तक्रारीवरुन कमांडरच्या चौकशीची मागणी केली आहे.'



Post A Comment:
0 comments so far,add yours