नागपूर, 2 डिसेंबर : इलेक्शन स्पेशल ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हरमित सिंग असं या आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. 
गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. त्यानंतर या जवानाचा जागीच मृत्यू झाला.
नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने ट्रेनमधील प्रवाशी प्रचंड घाबरले. त्यानंतर जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या असल्याची माहिती समोर आली. 
आत्महत्या केलेल्या हरमित सिंग या जवानाचा मृतदेह मध्य प्रदेशमधील पांढुर्णा इथं उतरवण्यात आला आहे. जवानाच्या आत्महत्येचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. तसंच हा जवान कुठला रहिवासी आहे, हेदेखील स्पष्ट झालं नाही.
दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हरमित सिंग या जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. जवानाने आपला जीव का संपवला, तसंच हा जवान नेमका कुठला आहे, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours