मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ईशान्य मुंबई या लोकसभा जागेसाठी राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांकडून आघाडीसाठीची बोलणी अंतिम टप्पात आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours