अमरावती: राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत अपशब्द वापरून अटक करण्याचे आदेश एका कार्यक्रमात दिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत चक्क त्यांना बालवाडीत प्रवेश दिला आहे.
अमरावतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे संतप्त पडसाद जिल्हाभर उमटू लागले आहे. आज युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे.
'भाजपचा शिक्षणमंत्री बालिश असून त्यांना विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचं खातं सरकारनं दिलं. मात्र, विनोद तावडे हे लायक नसून त्यांना पुन्हा नर्सरी (बालवाडी)पासून शिक्षण घ्यावं', अशी टीका करत कार्यकर्त्यांनी तावडे यांच्या नर्सरी(बालवाडी) प्रवेशाचा अर्जच सुरवाडी येथील निर्मल किड्स प्री प्रायमरी येथील मुख्याध्यापकांना दिला आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours