मुंबई, 8 जानेवारी : देशातील प्रमुख चार शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव आज स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल महिन्याभरानंतर काल इंधनाचे दर वाढले होते. पण आज पुन्हा दर स्थिर राहिले आहेत.
पेट्रोलच्या दरात सोमवारी 21 पैशांनी तर डिझेलमध्ये 8 पैशांची वाढ झाली होती. 17 डिसेंबरनंतर ही पहिलीच इंधन दरवाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर कमी होताना पाहायला मिळत होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पण आता इंधन दर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
काय आहेत मुंबईतील दर?
पेट्रोल : 74.16
डिझेल : 65.12
पेट्रोल-डिझेलचे दर का झाले होते कमी?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours