मुंबई, 27 मार्च: राज्यातील सर्वसामान्य जनतेला ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात 6 टक्के वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. 
राज्य वीज आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. येत्या चार दिवसात महावितरणची दरवाढ लागू होईल आणि विजबिलात 6 टक्क्यांनी वाढ होईल. आयोगाने महावितरणला 8 हजार 268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours