नवी दिल्ली, 8 मार्च : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देण्याची शक्यता आहे. 
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे पक्ष टाळू शकतो. आज होणाऱ्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय होईल, अशी माहिती आहे. 
असा निर्णय झाला तर भाजपच्या अनेक नेत्यांनी झटका बसणार आहे. यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगत सिंह कोश्यारी, भुवन चंद खंडुरी, शांता कुमार, हुकुमदेव नारायण यादव, बिजया चक्र वर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाणार, हे निश्चित आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या 15 उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. या यादीत गुजरातमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजीअध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे. तर राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत पटेल हे 1997 ला एमएस विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांची बडोदामधून काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या कारकिर्दीतच स्थानिक पालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक होती. परंतु, पटेल हे पाटीदार समुहाचे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमधील पाटीदार समुहांची लोकसंख्या पाहता पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours