इस्लामाबाद, 7 मार्च : खोटं बोलण्यामध्ये पाकिस्तान कोणतीही कमी सोडताना दिसत नाही. 'पाकिस्ताननं भारताची दोन विमानं पाडली' असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी बुधवारी(6 मार्च) संसदेमध्ये दिली आहे. यावेळी त्यांनी नोमान अली खान या पायलटची स्तुतीदेखील केली. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसली होती. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं होतं. तर, मिग -21 क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेऊन तब्बल 60 तासांनंतर त्यांची सुटका केली होती. यापूर्वी देखील पाकिस्ताननं भारताची दोन विमानं पाडल्याचा दावा केला होता. पण, भारतानं मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला होता.
दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याच्या निर्णयावर आता बेनझीर भुट्टो यांचा मुलगा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी टीका केली आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामध्ये पाकिस्ताननं घाई केली असून धोका पत्कारल्याचं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय, दहशतवाद्यांविरोधात देखील भारतानं आता कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours