मुंबई, 8 मार्च : सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वेमुळे डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारचा दिवस हा हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. माहिम स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 20 ते 25 मिनिटं उशिरानं होत आहे.  अप दिशेच्या धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं होत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूक ही दिवसभर उशिरानं असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, माहिम स्थानकातील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असून पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours