पुणे, 13 मार्च : माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणाऱ्या पवारांनी आता आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं. 'साहेबांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,' असं आवाहन त्यानंतर शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर आता अजित पवार यांचे सुपुत्र आणि रोहित यांचे भाऊ पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'रोहित दादा जे बोलला ते बरोबर आहे. मी त्याच्या सोबत आहे,' असं म्हणत पार्थ पवारांनीही रोहित यांच्याच सुरात सूर मिसळले आहेत. पार्थ पवारांची मावळमधून लढण्याची इच्छा हे शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेण्यामागील कारण आहे, असं बोललं जात होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांना निवडणूक लढवण्याचं केलेलं आवाहन म्हणजे पवार घराण्यातील संघर्ष आहे, अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. पण पार्थ पवारांनी रोहित यांच्या सुरात सूर मिसळवत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours