मुंबई, 01 सप्टेंबर : भव्य देखावे, पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना आणि तेवढच देखणं विसर्जन, समर्पित कार्यकर्त्यांची फौज आणि जोडीला शिस्त आणि उत्तम नियोजन. ही सर्व वैशिष्टय आहेत चेंबुरच्या प्रसिद्ध सह्याद्री क्रीडा मंडळाची. सह्याद्रीचा गणपती म्हणून हा गणपती मुंबईत सर्वदूर प्रसिद्ध आहे. चेंबुरमधल्या टिळकनगरचा  हा लाडका राजा. गणेशोत्सवाच्या काळात या नगरातल्या प्रत्येक घरातला किमान एक तरी सदस्य या मंडळाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असतो. त्यामुळं इथल्या लोकांचं आणि बाप्पाचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालंय. आणि हे नातंच मंडळाच्या यशाचं मुख्य कारण आहे. कुठल्याही मंडळाच्या यशासाठी आवश्यक असतात ते उत्तम कार्यकर्ते, कार्यक्षम कार्यकारी मंडळ, चोख नियोजन आणि त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त. या सर्वच गोष्टींचा मेळ घालून सह्याद्री क्रीडा मंडळाने आपली एक कामाची पद्धत निर्माण केलीय. या कार्यपद्धीमुळेच मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. 1977 मध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना झालीय. यंदाचं मंडळाचं 41 वं वर्ष आहे. गेल्या चार दशकातल्या कामाने या मंडळाने नवीन मंडळांनाही दिशा दिलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours