01 सप्टेंबर : नोटबंदीच्याकाळात माओवादी नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचं समोर आलंय. पाच माओवादी समर्थकांच्या अटकेवर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर केलेत त्यात ही बाब उघड झालीय. कवी आणि विचारवंत वरवर राव यांनी नागपूरातले वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेल्या पत्रात या मतभेदांचा उल्लेख आढळतो. गडचिरोलीत देण्यासाठी पैसे पाठवले होते मात्र ते अजुन का पोहोचले नाहीत अशी विचारणा राव यांनी गडलिंग यांच्याकडे केली होती. पैसे नसल्यानं चळवळ थंडावल्याचंही राव यांनी पत्रात लिहिलं होतं. ते पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलं आहे. या पत्रातून स्पष्ट होतं की या प्रकरणात अटक केलेल्या 5 जणांचा सुरक्षा दलांना
वरवर राव यांनी नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्र
नोटबंदीमुळे जंगलातल्या लोकांना पैशाची अडचण भासत आहे. तुमच्याकडे पैसे पाठवले होते मात्र त्याच वितरण अजून झालं नाही अशी माहिती आहे. नेमकं काय झालं तेही कळत नाही. पैसे नसल्यानं कारवाया थंडावल्या आहेत.
(माओवादी) साईबाबांच्या खटल्यामध्ये आपण अपयशी ठरलो कारण न्यायव्यवस्थेनं शत्रूशी हातमिळवणी केली आहे. नोटबंदीमुळे आम्ही आमच्या गडचिरोली आणि छत्तीसगडमधल्या कॉम्रेड्सना पैसे पाठवू शकलेलो नाही. पण यात माझा दोष नाही. गेल्या 7-8 दिवसांपासून मी पैसे पाठवतो आहे. बस्तरमधल्या हल्ल्यामुळे देशाला आपली ताकद कळली आहे. केंद्र सरकार हादरून गेलं आहे.
मला आशा आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली आपले कॉम्रेड अशाच मोठा कारवाया करत राहतील. बस्तरमध्ये मोठा हल्ला करा हा तुमचा आदेश मी पोहचवला आहे.
आपल्या कॉम्रेड्सच्या माहितीनुसार, उस्सूर, पामेद, एमलागुंडा, पलचल्मा, केरलालपालमध्ये हल्ला करणं सोपं जाईल. कारण या भागांमध्ये केंद्राचा फौजफाटा कमी असतो. कॉम्रेड साईबाबांच्या खटल्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. आम्ही राम जेठमलानींशीही बोललो आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours