मुंबई, 01 सप्टेंबर : भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. या सगळ्या दंगलीत माओवादी कनेक्शनच्या संशयावरून 5 जणांना अटक करण्यात आली. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश आहे. यातील गौतम नावलाखा यांनी 13 मार्च 2018 रोजी माओवाद्यांच्या कामाबद्दलचा एक रिपोर्ट जारी केला होता.
गौतम नावलाखा यांनी लिहिलेल्या या अहवालात सरकारच्या विरोधी कारवायांसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याकरता धोरणांची चर्चा झाली. यात त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांच्या संघटनांविषयीचा या रिपोर्ट आहे. याला 'C1' रिपोर्ट असं नाव देण्यात आलं आहे.
या अहवालामध्ये त्यांनी नमुद केलं आहे की, सरकारविरोधी कारवायांसाठी माओवाद्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. शोषित वर्गाच्या संघर्षात माओवादी गटांच्या सहभागाचा उल्लेख करण्यात आला आहे. C-1 माओवादी समितीसाठी 20 गट, 5 मोठ्या संघटना आणि 4 गुप्त संघटना काम करत आहेत.
त्यांच्या या संघटनांना वाढवण्यासाठी तरुण वर्गाला टार्गेट केलं जातं आहे. त्यासाठी शाळा आणि कॉलेजातल्या मुलांचं ब्रेनवॉश करून त्यांना संघटनानांमध्ये समाविष्ट करून घेण्याबद्दलही या अहवालात लिहण्यात आलं आहे. आताची ही तरुण मुलं मोठ्या उत्साहाने माओवादी संघटनांनमध्ये सहभागी होत आहेत आणि काम करत आहेत, त्यामुळे भविष्यात ते या संघटनांना पुढे नेऊ शकतात असंही गौतम यांनी लिहल्याला अहवालात म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours