मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.  आज सकाळी साडे दहा वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार आहे.

बुधवारी रात्री मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या  बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्या विधीमंडळात एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती दिली. याआधी पुन्हा एकदा उपसमितीची बैठक पार पडणार आहे. त्यामुळं एटीआर आणि विधेयकामध्ये मराठा आरक्षणासाठी काय तरतूद करण्यात आली आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान,मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. बुधवारी अधिवेशनाच्या आधी याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपसमितीचे नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली होती
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours