मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यशौकिनांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. कारण, 31 डिसेंबरला मुंबईत रात्रभर हाॅटेल, बार आणि पब खुले राहणार आहे. याबाबत केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

थर्टीफस्टच्या सेलिब्रिशेनसाठी सर्वत्र मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. खास करून थर्टीफस्टच्या जल्लोषासाठी मोठ्या हॅाटेलपासून ते ढाब्यापर्यंत लगबग सुरू आहे. 

काल गुरुवारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत आनंदोत्सवाची रात्रभर परवानगी द्यावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तशा आशयाचं एक पत्रच आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. 

"जे दिवसा कायदेशीर आहे, ते रात्री बेकायदेशीर कसे", असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. "नाईट लाईफचा सकारात्मक विचार केल्यास रोजगार निर्मितीत वाढ होईल", असा दावाही आदत्य ठाकरे यांनी केला होता. या आधीही आदित्य यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती.

अखेर आदित्य ठाकरे यांच्या या मागणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे थर्टी फस्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत बार, हाॅटेल आणि पब खुले राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सेलिब्रेशन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours