चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयात भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांना 7 हजाराची लाच घेताना चंद्रपूर  लाचलुचपत विभागाने रंगे हाथ अटक केली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण चंद्रपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भद्रावती येथील तक्रारदारावर कारवाई  न करण्यासाठी तसंच त्याचा मोबाईल परत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांनी लाच मागीतली होती. मात्र तक्रारदारावर लाच द्यायची नसल्याने सदर प्रकरणाची माहिती चंद्रपूर लाचलुचपत विभागाला देण्यात आली. त्यानंतर मोठा सापळा रचून शुभांगी यांना रंगे हात पकडण्यात आलं आहे.
कारवाई करायची नसेल आणि मोबाईल हवा असेल तर 7 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी शुभांगी यांनी केली होती. त्यानंतर तरुणाने त्यांच्या नकळत ही माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर शुभांगी यांचं हे कृत्य रंगेहात पकडण्यासाठी मोठा प्लान रचण्यात आला आणि त्यांना लाच घेताना रंगे हात पकडलं गेलं. यानंतर त्यांना विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
नागरिकांचा सगळ्यात जास्त विश्वास त्यांच्या परिसरातील पोलिसांवर असतो. पण आपली सुरक्षा बजावणारे पोलिसच जर असं काही करणार असतील तर कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा अशी प्रतिक्रिया आता चंद्रपूरमधील नागरिक देत आहेत.
दरम्यान, हेच पोलीस आपल्याला न्याय देणार अशा आशेने लोक पोलीस स्टेशनचं दार ठोकतात. पण न्यायाच्या आणि सुरक्षेच्या याच घरात लाच घेतली जात असल्याने चंद्रपूरमधील नागरिक नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours