नवी दिल्ली,5मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यासंदर्भात ट्विट करताना दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'पुलवामा दुर्घटना' असा करून नवीन वाद निर्माण केला आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आम्हाला आमच्या जवानांचा, त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर विश्वासदेखील आहे. सैन्यामध्ये माझ्या अनेक ओळखीचे आणि जवळचे नातेवाईक कार्यरत आहेत. ज्यांना कुटुंबीयांपासून दूर राहून देशवासीयांचे संरक्षण करताना मी पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईवर काही परदेशी माध्यमांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Home
ताज़ा ख़बर
राष्ट्रीय
शहिदांचा अपमान! दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून केला उल्लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)



Post A Comment:
0 comments so far,add yours