मुंबई, 5 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13 वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (9 मार्च)होणार आहे. या सोहळ्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत कुणासोबत जाणार याबाबतची भूमिका जाहीर करतील, अशी माहिती आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेची निवडणुकीबाबतची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे कार्यकर्त्यांसमोर आपली अंतिम भूमिका जाहीर करतील. तसंच राज आपल्या भाषणात दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारवर तोफ डागण्याचीही शक्यता आहे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. पण अजूनही कोणताही निर्णय समोर आला नसून मनसेत अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. 
दुसरीकडे, शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही अंतिम टप्प्यात आहे. अशातच लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून मात्र अजूनही कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours