मुंबई, 26 मार्च : लोकसभा निवडणुका समोर असताना आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यास भाजप उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेता सनी देओलला उमेदवारीसाठी राजी करण्यासाठी राज्यातल्या नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वानं जबाबदारी सोपवली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
खरंतर निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वत: फार उत्सुक नाही. पण तरीदेखील भाजप नेते सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना याबाबतगळ घालणार आहे. त्यामुळे भाजपच्या आग्रहाला मान देत सनी देओल राजकारणात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरवणार आहे.
गुरुदासपूर इथे अभिनेते विनोद खन्ना भाजपचे खासदार होते.पंजाबमध्ये १३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहेत. 
राजकारणातील वादग्रस्त अभिनेत्री करणार भाजप प्रवेश?
लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours