मुंबई,10 मार्च : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध कामांनिमित्त मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते दिवा तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.  यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.40 वाजेपासून  ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्र्याच्या दिशेनं एकही लोकल धावणार नाही. तसंच सकाळी 11.10 वाजेपासून  ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत वांद्रे, चुनाभट्टीहून सीएसएमटी दिशेकडेही एकही लोकल धावणार नाही. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत, तर वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी 9.53 वाजेपासून ते दुपारी 2.44 वाजेपर्यंत जाणाऱ्या सर्व लोकल रद्द केल्या आहेत.
- सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावकडे सकाळी 9.56 वाजेपासून ते दुपारी 4.16 वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी रेल्वे मार्ग सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 वाजेपर्यंत बंद असेल. मेगाब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours