नवी दिल्ली, 13 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठ भाकित वर्तवले आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो, पण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत', असे भाकित शरद पवार यांनी मंगळवारी (12 मार्च) वर्तवले आहे. शरद पवार असंही म्हणाले की, 'जेवढे राजकारण मला समजते, त्यानुसार मला असं वाटत नाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मी काही ज्योतिषी नाही, पण भाजपला सत्तेत येण्यासाठी जेवढ्या जागांची आवश्यकता आहे, तेवढ्या मिळणार नाहीत'.
'लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप हा पक्ष मोठा पक्ष ठरेल. पण भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल, असे मला वाटत नाही. त्यांना आधीच्या तुलनेत कमी जागा मिळतील. निवडणुकीत सर्वाधिक मोठा पक्ष ठरूनही भाजपला हवा असलेला नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणार नाही. सत्ता मिळवण्यासाठी भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि जर असे घडलं तर भाजपला नवीन पंतप्रधान शोधावा लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours