मुंबई, 13 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील हे आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे. त्यामुळे नगरमधून लढताना सुय विखे यांना शिवसेनेचीही मदत होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours