पुणे, 4 मार्च : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपमध्ये दिलजमाई झाली. त्यानंतर आता शिवसेनेनं पुणे मनपातील सत्तेत देखील वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. शिवसेनेनं आता उपमहापौरपदासह एक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे.
2014मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असोत अथवा पालिका निवडणुका यामध्ये देखील दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. मुंबई आणि ठाणे मनपा वगळता पुणे मनपामध्ये भाजपनं विजय मिळवला होता. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांनी परस्परांवर जोरदार हल्ले देखील चढवले होते. पण, आता दिलजमाई झाल्यानंतर शिवसेनेनं सत्तेत वाट्याची मागणी केली आहे. यावर आता भाजप काय भूमिता घेते हे पाहावं लागणार आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours