नवी दिल्ली, 6 मार्च: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'दुर्घटना' म्हणून केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नवीन वादात सापडले आहेत.  शहीद जवानांचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका होऊ लागली आहे. भाजपकडूनही दिग्विजय यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण याउलट आता दिग्विजय सिंह यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी केलेल्या ट्विटवरून तुम्ही (भाजप)आणि तुमचे मंत्री माझ्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा, देशद्रोही असल्याचा आरोप करत आहेत. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours