मुंबई- मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या कुर्ल्यामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी (5 मार्च) सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.  मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून सख्ख्या भावानंच भावावर गोळीबार करुन  हत्या केली आहे. यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण देखील केले. विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours