औरंगाबाद, 9 मार्च : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसंच या मतदारसंघातून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमानचे उमेदवार असणार आहेत.
'औरंगाबादचं राजकारण पाहता सुभाष पाटील इथून निवडून येतील,' असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. औरंगाबादला चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणारच, असंही राणे म्हणाले.
कोण आहेत सुभाष पाटील?
सुभाष पाटील आधी शिवसेनेत होते, नंतर मनसे आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची मराठवाडा विकास सेना स्थापन केली. आता त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला असून ते औरंगाबादमधून निवडणूक लढवतील.
दरम्यान, 'जिथं जिथं शिवसेना आहे तिथं स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार. राज्यात किमान 5 जागा लढवणार आहे,' अशी घोषणा नारायण राणेंनी केली आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours