पुणे, 9 मार्च : पुणे जिल्हातील मावळ इथं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच आरोपींकडून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत.
मावळमधील एका डान्सबारमध्ये दोन गटात वाद झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पण डान्सबारमधील आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला. यावेळी मोहिते यांच्या पायात गोळी लागून ते जखमी झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मावळमधील फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल देण्यावरून दोन गटात वाद झाल्याने एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. 
गोळीबार करणाऱ्यांमध्ये 5 ते 6 जणांचा समावेश असून यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून लवकरच उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours