नवी दिल्ली, 10 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण आज संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील वेळापत्रक कसं असणार, हे जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांच्या तारखा नेमक्या कधी जाहीर होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. या निवडणुकांची घोषणा 8 मार्चलाच होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. पण अखेर आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेतच निवडणुकांची घोषणा होईल, हे जवळपास निश्चित आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours