मुंबई, 11 मार्च : मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. पण काँग्रेसने मात्र अजूनही स्पष्टता दर्शवलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीलत मनसेबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज केंद्रीय नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तसंच तसेच शरद पवार आणि राहुल गांधी यांचीही भेट होणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं राष्ट्रवादीने आधीच जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर पवार आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत मनसेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता मनसे महाआघाडीत जाते की स्वबळावर निवडणूक लढवणार, हे दोन ते तीन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची नावं आज दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours