सातारा, 9 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत.
सातारा मतदारसंघातून पुन्हा एकदा उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत कलह आहे. हा वाद निवडणुकीत पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तंच माढा लोकसभा मतदारसंघामध्येही सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती आहे.
उदयनराजेंची उमेदवारी आणि वाद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजेंच्या अडचणी वाढतात का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours