मुंबई, 29 नोव्हेंबर : एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार मिळणार नाही आहे. मुंबई आणि दिल्लीच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे तसे आदेश देण्यात आले आहेत. कारण एअर इंडियाप्रमाणे एमटीएनएलही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे.
एअर इंडिया पाठोपाठ आता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही कंपनी सुद्धा आर्थिक दृष्टया अडचणीत सापडली आहे. निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळणार नाही. मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
निधीच्या कमतरतेमुळे बँकांना नोव्हेंबर महिन्याचा पगार काढण्याचे निर्देश सध्यातरी दिलेले नाहीत असे या पत्रकामध्ये म्हटले आहे. एमटीएनएल ही सरकारी कंपनी असून मुंबई आणि दिल्ली या महानगरात कंपनीची ग्राहक संख्या जास्त आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours