औरंगाबाद, 5 मार्च : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असण्याच्या संशयावरून एटीएसने चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये खुलताबाद येथील एका डॉक्टरचाही समावेश आहे.
प्रसाद किंवा भंडाऱ्यात विष कालवून घातपात घडवण्याचा या आरोपींचा कट होता. एटीएसला याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशयावरून खुलताबादमधील डॉक्टरची एटीएसकडून 3 दिवस चौकशी करण्यात आली. या डॉक्टरला गाव सोडून जाण्यास एटीएसने परवानगी नाकारली आहे. हा डॉक्टर मुंब्रा इथून अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत आणि औरंगाबादमध्ये ATS ची छापेमारी
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली होती. यावेळी मुंबईजवळच्या मुंब्रा आणि औरंगबाद इथं कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकून ISIS च्या 9 समर्थकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आलं.



Post A Comment:
0 comments so far,add yours