मुंबई, 12 मार्च : आगामी लोकसभा ऐन परीक्षेच्या काळात आल्यामुळे सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीएसाठी मे महिन्याच्या 2 ते 17 या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता 27 मे ते 12 जून या तारखे दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांकडून जाहीर करण्यात आल्या. आता या निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक-प्राध्यापकांची नियुक्ती केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे. पेपर तपासण्यासाठी निवडणुकीच्या धामधुमीतून शिक्षकांना वेळ मिळणे कठिण असून यामुळे परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे 8 एप्रिलच्या आधीच परीक्षा घ्यावी लागेल. आता या निवडणुकीच्या कामामुळे निकाल उशिरा लागू नयेत यासाठी शालेय शिक्षक आणि प्राध्यापकांना हे काम देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
दरम्यान, निवडणुकीचा निकालावर परिणाम होणार नाही असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीचे काम शिक्षक-प्राध्यापकांना फक्त चार दिवस असते, त्याचा निकालावर परिणाम होणार नाही अशी माहिती निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी 11 एप्रिलला मतदान होणार असेल त्याठिकाणी 8 एप्रिलच्या आधी पेपर घ्यावेत आणि राहिलेले पेपर 11 एप्रिलनंतर घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते.
दहावी-बारावीच्या परिक्षा मार्चअखेर संपणार आहेत. त्यानंतर शालेय परीक्षा 12 एप्रिलपर्यंत संपतील. शालेय परीक्षेचे निकाल 2 मेपर्यंत लागतात. मात्र, निवडणुकीच्या कामामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विलंब होऊ शकतो. काही शाळांमध्ये 80 ते 90 टक्के शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आले असल्याने याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, शालेय तसेच दहावी बारावीच्या निकालावर लोकसभेच्या निवडणूकीचा परिणाम होणार नाही. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours