सोलापूर, 5 मार्च : सोलापूरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणं सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांना महागात पडलं आहे. कारण शिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षानं केंद्रीय समितीतून त्यांचं तीन महिन्यांसाठी निलंबन केलं आहे.
पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. तसंच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभादेखील झाली.
मोदींच्या याच सभेत 30 हजार विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे व्यासपीठावरुन जाहीर आभार मानले होते.
मोदींचा सोलापूर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी 30 हजार घरांच्या प्रकल्पाच्या भूमीपूजनाबरोबरच महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेली कामं आदी विकास कामांचेही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.



Post A Comment:
0 comments so far,add yours